हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे, म्हणून आपण आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे. या दिवसात शरीराची मॉलिश केल्याचे अनेक फायदे असतात. असे केल्यानं शरीराची संपूर्ण वेदना नाहीशी होते आणि शरीरास मॉइश्चरायझर मिळतं.
हिवाळा सुरू होतातच त्वचेसह बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवतात. या हंगामात त्वचा कोरडी पडते आणि सुस्तपणा वाढतो. थंडीच्या दरम्यान त्वचे आणि शरीरास पुरेशी पोषणाची गरज भासते. हिवाळाच्या हंगामात सांधे आणि स्नायूमध्ये वेदना आणि दुखापत झालेली असणाऱ्या लोकांचे त्रास वाढतात.
या पासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे शरीराची मालिश करणे. हिवाळ्यात मालिश केल्यानं अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ या शरीराच्या मालिश करण्याचे 5 फायदे.
* रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते -
शरीराच्या वेदने पासून मुक्त होण्यासह मॉलिश शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला देखील बळकट करत. एका अभ्यासानुसार लिम्फ नोडच्या भोवती मालिश केल्यानं पांढऱ्या रक्तपेशींचा वेग वाढतो. हे पेशी अधिक सक्रिय होतात आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. दर आठवड्याला मालिश केल्यानं फ्लू आणि संसर्गाची लक्षणे देखील कमी होतात.
शरीराची मालिश केल्यानं अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. तथापि, आपण नेहमी योग्य मालिश थेरपिस्ट आणि योग्य तेलाने शरीराची मालिश केली पाहिजे.
* विश्रांती साठी -
चांगली मालिश केल्यानं शरीर आणि मेंदू दोघांना विश्रांती मिळते. थाई आणि एरोमा थेरेपीने मालिश केल्यानं मेंदू शांत राहतं. अशा प्रकारच्या मॉलिश मध्ये सुवासिक आवश्यक तेल जसे लव्हेंडर तेल, संत्र्याचे तेल, लेमनग्रास तेल वापरले जाते. त्यांच्या सुवासाने मन आणि मेंदूला विश्रांती मिळते आणि तणाव दूर होतं. हे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल ची पातळी देखील कमी करतं.
* वेदना कमी करतं -
हिवाळ्यात दुखणे अधिकच वाढतं. सांधे दुखी, स्नायूंमध्ये ताण येणं, फ्रॅक्चर, मोच इत्यादी पासून त्रस्त असलेल्या ज्येष्ठांना गुडघे, पाठीच्या खालील बाजूस दुखणे, मान आणि खांद्यांमध्ये तीव्र वेदना होते. शरीराच्या या भागाची नियमानं किंवा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा मॉलिश केल्यानं वेदने पासून आराम मिळतो.
* त्वचेला मऊ किंवा कोवळी बनवा -
सामान्यतः मालिश साठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या तेलांमध्ये बरेच प्रकारचे नैसर्गिक घटक आढळतात. हे घटक शरीरातील वेदनेला दूर करतात. जसे की सांधे आणि स्नायूंच्या वेदनेला दूर करणार्या तेलांमध्ये लेमनग्रास, नीलगिरी, कॅमोमाइल आणि लव्हेंडर असतात. हे त्वचेच्या खोल पर्यंत जाऊन पोषण देतात. या शिवाय तिळीचे तेल, ऑलिव्ह तेल, द्राक्षाचे तेल, जोजोबा तेल, बदामाचे तेल आणि डाळिंबाच्या बियांचे तेल जमलेली घाण दूर करतात आणि त्वचेला मॉइश्चराइझ करतात. यामुळे त्वचा कोवळी आणि मऊ बनते.
* रक्त विसरणं वाढवतं -
इतर हंगामापेक्षा हिवाळ्याच्या हंगामात अधिक सुस्ती आणि आळस वाढतो. सकाळी अंथरुणातून उठून मॉर्निग वॉक, योगा क्लास किंवा जिमखान्यात जाणं एक अवघड काम असतं. अशा परिस्थितीत शरीरास सक्रिय करण्यासाठी मालिश करणं हे सर्वात उत्तम विकल्प आहे. या नंतर गरम पाण्याने स्नान करणं फायदेशीर असतं.
शरीराची चांगल्या प्रकारे मालिश केल्यानं स्नायूंची वेदना देखील कमी होते आणि रक्त विसरणं वाढतं. तसेच आपण स्वतःला ताजेतवाने अनुभवतो आणि झोप न येण्याची समस्या असल्यास ती सुधारते. तसेच शरीर मालिश केल्याने सक्रिय राहतो.