मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:01 IST)

गडचिरोलीत दोन लहान मुलांचे मृतदेह रुग्णालयातून खांद्यावर घेऊन आई वडील चालत घरी पोहोचले

child death
महाराष्ट्रातील गडचिरोलीत तापावर उपचारासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे दोन मुलांना नेले. काही तासांतच दोन्ही मुले मरण पावले.नंतर कुटुंबीय मुलांना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले.मुलांचे मृतदेह घरी आणताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मुलांचे पालकांनी मृतदेह खांद्यावर घेत 15 किलोमीटर चालत घरी पोहोचले. हे प्रकरण बुधवारचे अहेरी तालुक्यातील पत्तीगावातील आहे. 
 
अहेरी गावातील रहिवासी वेलादी कुटुंबातील दोन मुलं आपल्या आई वडिलांसह दोन दिवसांपूर्वी पत्तीगावात आले होते. या मुलांना 4 सप्टेंबर रोजी ताप आला. आई वडील मुलांना घेऊन डॉक्टरकडे न जाता एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. त्याने मुलांना काही वनौषधी दिल्यावर त्यांची तब्बेत खालावली. सकाळी 10:30 वाजता एका मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा दुपारी 12च्या सुमारास झाला.नंतर त्यांना घेऊन पालक रुग्णालयात गेले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने देचालीपेठातुन रुग्णवाहिका मागवण्यात आली असता पालकांनी ते घेण्यास नकार दिला आणि दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायीच 15 किलोमीटर चालत पत्तीगांव घराच्या दिशेने निघाले.  नंतर त्यांच्या नातेवाईकाची बाईक मागवली आणि घरी पोहोचले. 

जिमलगट्टा रुग्णालयापासून पत्तीगावात जाण्यासाठी पक्की सडक नाही त्यामुळे चिखल आणि मातीतून जावे लागते. म्हणून मुलांचे मृतदेह घेऊन आई वडील पायीच निघाले.या प्रकरणाचा तपास पोलीस लावत आहे.
Edited by - Priya Dixit