समीर वानखेडेला अंतरिम दिलासा, 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडेने शाहरुख खानसोबत केलेल्या कथित चॅट समोर आल्या आहेत. आर्यन खान प्रकरणात मुंबई हायकोर्टाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 जून रोजी होणार आहे.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेवर आरोप आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. क्रूझमध्ये ड्रग्जचा समावेश असलेल्या आर्यन खान प्रकरणात मुंबई न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जून रोजी असून तोपर्यंत न्यायालयाने समीर वानखेडेला अंतरिम दिलासा दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor