शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (19:22 IST)

सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही - अजित पवार

राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
 
बुधवारी (14 एप्रिल) पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केलं.
 
"तुम्ही मला एक आमदार दिला की राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा," असं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात बोलताना म्हणाले होते.
 
या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार म्हणाले, "राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?"
 
"आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कुणी करू नये. हे सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही," असंही ते पुढे म्हणाले.