फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे

dilip walse patil
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:34 IST)
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीदरम्यान सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना लहान वयात मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कामावर फोकस असणारे देवेंद्र फडणवीस आहेत. पण, आता विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आणि विरोधक म्हणून भूमिका घेताना फडणवीस यांनी राज्याला कमीपणा येईल, असे काही करू नये. त्याकडे अधिक लक्ष द्यावे, हाच माझा त्यांना सल्ला आहे. असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना वळसे पाटील
म्हणाले की, फडणवीस हे फोकस असलेले व्यक्तिमत्त्व आहे. पण, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, प्रतिक्रिया देताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहिल्यास त्यांनाच त्याचा जास्त फायदा होईल. असं ते म्हणाले. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, धनंजय मुंडे
हे चांगले राजकारणी आहेत, चांगले वक्ते आहेत, निर्णय प्रक्रिया चांगली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क वाढवणे गरजेचे आहे.
पुढे ते म्हणाले, अजित पवार यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे ते कामामध्ये वाघ आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु, राजकारणात किंवा समाजासाठी काम करत असताना कामे कधीही संपत नाहीत. त्यामुळे राजकारण आणि कामाशिवाय अजित पवार यांनी गप्पा मारल्या पाहिजे, संपर्क साधला पाहिजे, तसाच तो वाढवला पाहिजे, असा एक सल्ला पवार यांना दिला आहे. तर, अशोक चव्हाण यांना मी मुख्यमंत्री म्हणून, खासदार म्हणून पाहिले. तर नियोजनबद्ध कार्य करणारे ते नेते आहेत. पण, पक्षात आणि पक्षाबाहेर अशोक चव्हाण यांनी संपर्क आणि विस्तार वाढवला पाहिजे. असं वळसे-पाटील म्हणाले.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

किराणा बाजारात Amulची एंट्री, ऑर्गेनिक गव्हाचे पीठ आणले

किराणा बाजारात  Amulची एंट्री, ऑर्गेनिक गव्हाचे पीठ आणले
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF),अमूल ब्रँड अंतर्गत उत्पादने ...

संभाजी राजेंच्या या ट्विटमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे

संभाजी राजेंच्या या ट्विटमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे
छत्रपती संभाजीराजे भोसले अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची (BJP) खेळी असल्याचा धक्कादायक दावा ...

उमेदवारी नाकारणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही : शाहू ...

उमेदवारी नाकारणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही : शाहू राजे
विधानसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे (Sambhaji Raje) यांना उमेदवारी शिवसेनेने ...

'राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही'नाना पटोले यांची राणा ...

'राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही'नाना पटोले यांची राणा दाम्पत्यावर टीका
नागपूर - भाजप खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल ...

लढत रंगणार; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार ...

लढत रंगणार; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार भाजपने केले 'या' नावावर शिक्कमोर्तब
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने अतिरिक्त उमेदवार दिला असून भाजपने देखील ही जागा ...