Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयटीआय प्रवेशासाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार

Updated: शुक्रवार, 31 जुलै 2020 (09:51 IST)
 
३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.
 
राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.
 
शैक्षणिक पात्रता 
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही.
 
दहावीची समकक्षता 
दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.
 
ऑनलाईन प्रक्रिया 
यंदा प्रवेश अर्ज भरण्यापासून हरकती नोंदविण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलायं. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments