शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (09:53 IST)

अ‍ॅपलचा चीनला झटका, iPhone11च्या उत्पादनाला भारतातून सुरूवात

अ‍ॅपलंनं चीनला आणखी एक मोठा झटका दिला आहे. अ‍ॅपलनं  फ्लॅगशिप फोन iPhone11 च्या भारतात उत्पादनाला सुरूवात केली आहे. पहिल्यांदाच अ‍ॅपल भारतात आपल्या मोबाईलच्या टॉप मॉडेलचं उत्पादन करत आहे. चेन्नईमधील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये या फोनच्या उत्पादनाला सुरूवात झाली आहे. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेला बळ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 
या मोबाईलचं उत्पादन टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती या क्षेत्रातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसंच पुढील काळात iPhone11 च्या निर्यातीवरही विचार होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. 
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅपल बंगळुरूनजीक असलेल्या विस्ट्रॉन प्रकल्पात आपल्या नव्या iPhone SE च्या उत्पादनावर विचार करत आहे. तसंच iPhone SE चं यापूर्वीच्या मॉडेलचं उत्पादन या ठिकाणी करण्यात आलं होतं. परंतु नंतर ते मागे घेण्यात आलं. सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इंन्सेंटिव्ह योजनेचा फायदा घेण्यासाठी अ‍ॅपल भारतात आपलं उत्पादन वाढवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि अमेरिकेतील संबंध अधिक ताणले गेले आहेत. या उचललेल्या पावलामुळे चीनवरील अवलंबन कमी होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.