Marathi Biodata Maker
✕

आमच्या पक्षात गटबाजी नाही - जयंत पाटील

Updated: बुधवार, 9 मे 2018 (16:45 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आज जयंत पाटील यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत होते. या फेसबुक लाईव्हला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
 

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ लेवलवर जास्त भर देणार असून पक्षाच्या संघटनेत तरुणांना संधी देण्यास आम्ही प्राधान्य देऊ, येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहनत घेईल असे आश्वासन पाटील यांनी दिले. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, पक्ष या बाबींकडेही लक्ष देईल असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील भ्रष्टाचारावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्याप्रमाणे अलिबाबा आणि चाळीस चोर होते त्याप्रमाणेच आपल्या राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे २२ मंत्री आहेत. राज्यातील मंत्री भ्रष्टाचार करतात आणि मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करतात असं धोरण सध्या राज्यात राबवले जात आहे अशी टीका त्यांनी केली. भाजप सूडबुद्धीचे राजकारण करत आहे. ज्येष्ठ नेते भुजबळ यांनाही सूडबुद्धीने अटक करण्यात आली होती. मात्र आता भाजपवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
 

या फेसबुक लाईव्हदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील हत्याकांड, राज्यातील पोटनिवडणुका, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सहकार चळवळ आणि राज्यातील इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवरात्रीदरम्यान सप्तशृंगी गडावर एफडीएची मोठी कारवाई, भेसळयुक्त मावा आणि १,४०८ किलो मिठाई नष्ट

सीजेपी नंतर, 'माशी मारणे' या वाक्प्रचारावरून तयार झालेल्या एमजेपी पक्षाने झुरळांना पाठिंबा दिला

६ एअरबॅग्ज आणि ५-स्टार सेफ्टी! ₹७.७९ लाखांच्या 'या' SUV ला ५ लाखांहून अधिक लोकांनी खरेदी केली

कापूस वेचणीपूर्वी ही काळजी घेतली तर गुणवत्तेवर होऊ शकतो चांगला परिणाम

LIVE: पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार गटाचा विजय

पुढील लेख
Show comments