suvichar

हे कधी झालं, जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षापूर्वी विकली

शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (15:17 IST)
जयप्रभा स्टुडिओची ही जागा दिव्ंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची होती. हा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभा केला होता.स्टुडिओच्या जागेचे तुकडे पडत अनेकांना ही जागा विकल्याचे समोर आले आहे. 15 फेब्रुवारी 2020 ला 6 कोटी 50 लाख रुपये किमतीला विक्री झाल्याच समोर आले आहे.
 
दरम्यान, कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूच राहणार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, हेरिटेज वास्तूची जागा विकल्याने अनेकांना धक्का बसला आहे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची कर्मभूमी आणि अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे निर्मितीस्थान असलेला कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा मुंबई उच्च न्यायालयाने कायम राखला. जयप्रभा स्टुडिओची जागा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची आहे.
 
राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज-33 दर्जाच्या वास्तूत केले. त्यानंतर लता मंगेशकर यांनी या विरुद्ध रिट याचिका केली होती. मात्र, लतादीदींची  याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

मुंबईत या तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार

आन से-यंगकडून पराभूत होऊन सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधूचा प्रवास संपुष्टात

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा करणार

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू

पुढील लेख
Show comments