Festival Posters
✕

कोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा

Updated: बुधवार, 29 नोव्हेंबर 2017 (17:06 IST)

कोपर्डीचा आजचा निकाल ऐतिहासिक आहे. १५ महिन्यांच्या लढाईला आज यश आले. या निकालामुळे राज्यातील पीडितांना, मुलींना आणि जनतेला आश्वासक दिलासा मिळाला. आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाद मागितली तरी त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी, असे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  चित्रा वाघ   यांनी व्यक्त केले.

 

धनंजय मुंडे : 

 कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल.
 

नीलम गोऱ्हे 

या निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे,  शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही स्वागत केले.

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही  आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल,  तिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments