शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:46 IST)

राष्ट्रवादीचे राज्यभरात हल्लाबोल, ये तो बस झांकी है, पदयात्रा अभी बाकी है

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनापासून राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात सरकारच्या विरोधात #हल्लाबोल आंदोलन पुकारले. या आंदोलनाची धग आता संपूर्ण राज्यात पसरू लागली आहे. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी (नाशिक) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे  यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड व सासवड येथील मोर्चाचे नेतृत्व केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात, विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी इस्लामपूर तहसील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तहसील, आमदार शशीकांत शिंदे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करुन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. यासोबतच बुलढाणा येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील, बीड जिल्ह्यात परळी व शिरुर कासार येथे महेबुब शेख यांनी, लातूर आणि इतर ठिकाणीही हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.