रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:39 IST)

न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल

सांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा  सीआयडी सुरु असून अजूनतरी  तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.  पोलिसांनी दोघांना  ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी  सीबीआयकडे द्यावी  मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.

दोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते.  मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात  अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.