रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (08:27 IST)

"औरंगजेब हिंदुंचा तर सोडा, मात्र मुस्लिमांचाही नेता होऊ शकत नाही"-देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
राज्याचे विरोधीपक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस  यांनी आज मुंबईतील वर्सोवामध्ये आयोजित वर्सोवा महोत्सवाला उपस्थिती लावली होती. फडणवीसांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. लीलावतीमध्ये एखादा फोटो ट्विट केल्यावर कारवाई करणारे, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींवर  कारवाई करत नाहीत. हनुमान चालिसा  म्हणणाऱ्यांवर कारवाई होते, मात्र काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही.
 
अकबरुद्दीन ओवैसींना मी सांगू इच्छितो की, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवून तुम्ही देशातील देशभक्त मुस्लिमांचा अपमान आहे. देशातील हिंदुच नाही तर मुस्लीमांचा देखील औरंगजेब नेता होऊ शकत नाही. कारण त्याने या देशावर आक्रमन केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी समोर डोकं ठेवणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही, त्यांची जागा त्यांना दाखवणार आहोत. उद्धव ठाकरे सध्या ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच निती ते सध्या चालवत आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मेट्रोचं उरलेलं थोडसं काम आता 4 वर्ष पुर्ण होऊ दिलं जाणार नाही. मात्र काळजी करु नका, योग्य वेळी योग्य न्याय जनता करेल. मुंबईच्या विकासाच्या हत्याऱ्यांना जनता माफ करणार नाही असं फडणवीस म्हणाले. भारतीताई लवेकर यांनी केलेल्या कामाबद्दल फडणवीसांनी त्यांचं कौतूक केलं.