ganesh chaturthi
✕

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

Updated: सोमवार, 20 मे 2024 (12:30 IST)
 
नैऋत्य मान्सूनने रविवारी (19 मे) देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटांवर धडक दिली. खुद्द भारतीय हवामान विभागाने (IMD) याला दुजोरा दिला आहे. 2024 मध्ये सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे.
 
मान्सून कधी येणार? (Maharashtra Monsoon Update 2024)
मान्सून महाराष्ट्रात कधी बरसेल याची संभाव्य तारीख हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून वेळेवर किंवा त्याच्या काही दिवस आधी राज्यात दाखल होईल. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्याच्या सुमारास महाराष्ट्रात मोसमी पाऊस पडणार असून, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
 
केरळमध्ये यंदा 31 मे च्या सुमारास मान्सूनचा पाऊस सुरू होईल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. यानंतर, महाराष्ट्राच्या खालच्या कोकणात मान्सूनचे आगमन त्याच्या सामान्य तारखेच्या आसपास होईल. 11 जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख 5 जून आहे.
 
मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती
खरे तर बंगालच्या उपसागरात संभाव्य चक्रीवादळ नसणे हे मान्सूनच्या वेळेवर प्रगती होण्याचे लक्षण आहे. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याच्या वेळी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मान्सूनच्या वेळेवर प्रगती होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली दिसते. चक्रीवादळ निर्मिती सहसा मान्सूनच्या प्रवाहात व्यत्यय आणते. तथापि सध्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार हे आश्वासक असल्याचे दिसत नाही.
 
IMD नुसार, मान्सून साधारणपणे 9-10 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या काही भागांत दाखल होतो. तर 10 जूनच्या आसपास पुण्यात आणि 11 जूनच्या आसपास मुंबईला धडकते. मात्र, राज्याच्या सुदूर दक्षिण भागात मान्सूनच्या आगमनाची तारीख 5 जूनच्या आसपास आहे.
 
सध्याची हवामान परिस्थिती दक्षिण-पश्चिमी वारे हळूहळू मजबूत होत असल्याचे दर्शवित आहे. त्यामुळे केरळमध्ये 28 ते 31 मे दरम्यान कधीही मान्सून सुरू होऊ शकतो. त्याच वेळी, 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून त्याच्या सामान्य तारखेपर्यंत पोहोचू शकतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

अमित शाह निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मला भाजपशी काही अडचण नाही...’; गर्जना मोर्चात राज ठाकरेंनी मांडल्या प्रमुख मागण्या

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली; पुणे-नागपूरमधील तीन जागांसाठी नावे निश्चित

नोएडाच्या सर्वात उंच इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून इंजिनीयरची आत्महत्या

LIVE: राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments