Dharma Sangrah

आता मृतदेहांची करोना चाचणी नाही

Updated: सोमवार, 22 जून 2020 (08:47 IST)
 
करोना साथीच्या उद्रेकामध्ये फक्त न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन करावे. अन्य मृतदेहाची बाह्य़तपासणी, रुग्णांची माहिती, इतर आजार, मृत्यूच्या आधीची वैद्यकीय स्थिती यावरून मृत्यूचे कारण देण्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केले आहे.
 
प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा मृतदेह असल्यास किंवा करोनाची लक्षणे असल्यास चाचण्या केल्या जात होत्या. परंतु यांचे अहवाल येईपर्यत मृतदेह रुग्णालयाच्या ताब्यात असल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत होते. शिवाय मृत्यूचे कारण देण्यासही वैद्यकीय अधिकारी तयार होत नसल्याने काही वेळेस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत असत. 
 
आता मृतदेहाच्या चाचण्यांबाबतचा संभ्रम दूर करत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. केवळ न्यायवैद्यक प्रकरणे सोडता मृतांची करोना चाचणी करू नये, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: नितेश राणे यांनी मुंबईतील अन्न सुरक्षेसंदर्भात तुकाराम मुंडे यांना जाहीरपणे आव्हान दिले

गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर महिला बाईकस्वाराचा पाठलाग करून तिला धडक दिली, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: पुण्यातील २३,११७ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

वडील आणि मुलगा एकत्र पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का! नियम काय सांगतात?

कमवा लाखोंचे उत्पन्न: जाणून घ्या सुपारी लागवडीची संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments