Daily Horoscope
✕

मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात

Updated: बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:27 IST)
●मराठा आरक्षणाबाबत सरकार विरोधी पक्षाला बोलू देत नाही. विखे पाटील विरोधी पक्षनेते
●मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आजच करा- जयंत पाटील
●मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय मराठा आमदारांची जोरदार घोषणाबाजी.
●विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटांसाठी आणि पुन्हा विधानसभा तीन वाजेपर्यंत तहकूब.
●मराठा आरक्षणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी केला गदारोळ 
●सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन केला गदारोळ 
●आशिष शेलार यांना स्टेजकडे जाण्यापासून तरूणांनी रोखले
●मराठा मोर्चामुळे भायखळा येथील सेंट मेरी शाळेसमोरील मार्ग बंद केला
●द्रुतगती मार्गावर २० तज्ञ डॉक्टर आणि ३ रुग्णवाहिका सज्ज
●मराठा बांधवाकडून पोलिसांना पाणी आणि नाश्त्याचे वाटप
●बारामतीचे मावळे सायकलवरुन मुंबईत दाखल
●मराठा क्रांती मोर्चा सर्वात मोठी - मराठा मोर्चेकरी आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार
●मराठा मोर्चा: मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
मराठा मोर्चा
●‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत आज मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली आहे.
 
●मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.
 
● पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, आनंदनगरहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या गतीनं.
 
● मुंबई मराठा क्रांती मोर्चा : मुंबई जकात नाक्यावर वाहनं पार्क करुन मुंबईकडे जाण्याचे मोर्चेकरांना आवाहन.
 
● मुंबईकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून निर्णय MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
 
● मराठा क्रांती मोर्चा
वाशी टोल नाक्यावर वाहतूक सुरळीत. कोंडी टाळण्यासाठी टोलवसुली नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 तर लहान 200 वाहने मुंबईला रवाना.
 
● मराठा क्रांती मोर्चा
नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क
 
● मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; चंद्रकांत पाटील म्हणातात, सरकारचा विरोध नाही 
 
● अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास; 500 शाळांना सुटी, वाहतूक मार्गात बदल  
चेंबूरपासून वळवा वाहने
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.
 
‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.
 
प्रश्न तत्काळ सोडवा : राणे
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
 
वैद्यकीय सुविधा सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

World Cotton Day 2026 जागतिक कापूस दिवस का साजरा केला जातो? इतिहास थीम आणि महत्त

LIVE: पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ

पुणे महापौरांचे रोहित पवार यांना' पुणे बंद'ची धमकी दिल्यानंतर उघड आव्हान

उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सर्व आठ राज्यसभा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि का साजरा केला जातो इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments