सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (08:44 IST)

आज बाळासाहेबांची आठवण येतेयं ;सुप्रिया सुळे

supriya sule
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतीचे आवाहन केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. मला उध्दव ठाकरेंचा अभिमान वाटतो. आज बाळासाहेबांची आठवण येतेयं. सेना कुटुंबासारखी राहिली आणि राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाराष्ट्राती सध्य परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात दडपशाहीचं सरकार नव्हत आणि नसेल. कुटुंबात भांड्याला भांड लागताचं. यावर बसून चर्चा केली पाहिजे. केवळ टि.व्हि वर बोलणे म्हणजे सर्व काही होत नाही. चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा झालीचं पाहिजे. सत्ता येते जाते मात्र नाती ही कायमस्वरुपी राहतात. आज उध्दवजींनी जे आवाहन केलं आहे ते एका मोठ्या भावासारखं केलं आहे. जे सर्वात पुढे बोलत आहेत ते पहिला राष्ट्रवादीत होते हे विसरुन चालणार नाही.