Marathi Biodata Maker

आमदार अपात्रता प्रकरण; सोमवारपासून अंतिम सुनावणी

Updated: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (08:18 IST)
 
साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात गटात सुरू असलेला आमदार अपात्रतेचा वाद आगामी वर्षाच्या सुरुवातीला निकाली निघणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील अंतिम सुनावणीला उद्या सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता सकाळच्या सत्रातील अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रातील अंतिम सुनावणी होणार आहे. 18, 19 आणि 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाणार आहे.
 
शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील या प्रकरणातील सुनावणीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे. यानंतर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणाचा निकाल देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपेक्षित आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

जपानमध्ये निसर्गाचा प्रकोप; ७.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर मोठा मॉल कोसळला

अमरावतीमध्ये बनावट शिधापत्रिका रद्द, मिशन सुधार अभियानांतर्गत मोठी कारवाई

ETPL 2026 full schedule : नवीन टी२० लीगचे वेळापत्रक जाहीर झाले असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पहिल्यांदाच आरोग्य विमा घेत आहात का? तर तुम्ही या ४ गोष्टी समजून घेतल्या पाहिजे

पुढील लेख
Show comments