Dharma Sangrah
✕

मुंबई पोलीस आज उर्फी जावेदची चौकशी करणार

Updated: शनिवार, 14 जानेवारी 2023 (15:17 IST)

याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे.तर उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर धमकावल्याचा आरोपही केला आहे. त्यानंतरच मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आज अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 
 
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीच्या संदर्भात टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया  उर्फी जावेद यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले:
 
 उर्फीवर कडक कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती.  उर्फीवर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा नंगा नाच चालणार नाही. मी उर्फी जावेदला जिथे पाहील तिथे तिच्या कानाखाली वाजवेन. तर यावर उत्तर देताना उर्फी म्हणाली होती की, 'मी असेच वागणार.

या संदर्भात शुक्रवारी उर्फी जावेद महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भेटण्यासाठी गेली. यावर रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की ,भाजप नेते अयोग्य भाषा वापरत आहेत, जी कोणत्याही प्रकारे योग्य नाही. याशिवाय उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनीही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहून आणि ऑनलाइन माध्यमातूनही तक्रार दाखल केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

दिल्लीतील आंदोलकांच्या अटकेमुळे सोनम वांगचुक संतप्त, उपोषण आणि पायी मोर्चाचा इशारा

तुम्ही हवे तितके पोलीस बोलवा, आम्ही मागे हटणार नाही..." - राहुल गांधींचा मोदी सरकारवर मोठा हल्ला

पुढील लेख
Show comments