टोळक्याकडून दाम्पत्याची निघृण हत्या
जादूटोणा करतात असं म्हणत पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या औंढे गावात एका टोळक्यानं दाम्पत्याची निघृणपणे हत्या केलीय. नवसू वाघमारे (५५) आणि लिलाबाई मुकणे (५०) असं हत्या झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. या प्रकरणी खेड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा तपास खेड पोलीस करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लिलाबाई यांच्या मुलानेच आपली आई आणि सावत्र वडील यांची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवसू वाघमारे यांची पहिली पत्नी त्यांना सोडून गेली होती आणि लिलाबाई यांचे पतीदेखील त्यांना नीट वागवत नव्हते. त्यामुळे नवसू आणि लिलाबाईंनी लग्न केलं होतं.