Dharma Sangrah
✕

घर मालकाला भाडेकरुसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले!

Updated: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (08:58 IST)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद सुरेश शेट्टी हे मेहरून परिसरात राहतात. दोन दिवसांपासून प्रमोद शेट्टी बेपत्ता होता. त्यामुळे प्रमोदच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रमोदचा शोध घेतला. दरम्यान प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर आढळून आला होता. पोलिसांनी प्रमोद मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता प्रमोदची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते.
 
एमआयडीसी पोलिसांनी आपली चक्र फिरवत घटनेची चौकशी करत पाळेमुळे खोदून काढत घटनेचा छडा लावला. दरम्यान, पोलिसांनी संशयीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित सुनील लियामतखा तडवी (वय. २६) आणि सत्यराज नितीन गायकवाड जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले होते. पोलिसांनी तेथून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
 
खुनाची दिली कबुली
एमआयडीसी पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस खाक्या दाखवतात. त्यांनी खुनाची कबुली दिली. सुनील तडवी हा प्रमोद यांच्या घरात भाड्याने राहतो. त्याच्या पत्नीसोबत प्रमोद याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता या कारणावरून तडवी याने सत्यराजाला सोबत घेत प्रमोद याचा खून केला. असा कबुली जबाब दोघा संशयतांनी एमआयडीसी पोलिसांना दिला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

E-SPRINTO G1 Electric Scooter : या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरमुळे रोजचा प्रवास सोपा होईल, इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या

आत्महत्या करण्यापूर्वी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने कॉपी केल्याबद्दल संस्थेकडे लेखी माफी मागितल्याचा पोलिसांचा खुलासा

मुंबईचे पाणी संकट अधिकच गंभीर; बीएमसीकडून १० टक्के कपात

LIVE: महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! मुंबई-कोकणात उष्णतेचा इशारा

महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रिये वर दावे आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली

पुढील लेख
Show comments