1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (08:08 IST)

नाशिक शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वसतिगृह संचालकाला अटक

rape
नाशिक शहरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.म्हसरूळ येथील निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुली सोबत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या वस्तीगृहाच्या संचालकानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नाराधामा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील माने नगर परिसरात हा प्रकार घडला आहे.
 
या घटनेने नाशिक हादरले आहे. द किंग फाऊंडेशन संचालित आधाराश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुले मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर ३० वर्षीय संचालकानेच बलात्कार केल्याचं समजतंय. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यास ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला आता कोर्टात हजर देखील करण्यात आलेला आहे.
मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा हादरले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor