मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तळेगाव प्रकरणी सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार

तळेगाव प्रकरण
तळेगाव येथील अल्पवयीन बालिका अत्याचार प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. आता संशयिताविरोधात सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. येत्या गुरुवार पर्यंत न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्यता आहे़. 
 
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. यात सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे़. पोलिसांनी तयार केलेल्या या दोषारोपपत्राबाबत जिल्हा सरकारी वकीलांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे़. जिल्हा सरकारी वकीलांकडे सादर करण्यात आलेल्या या दोषारोपत्रावर मार्गदर्शन घेतल्यानंतर येत्या गुरुवारपर्यंत ते न्यायालयात सादर केले जाईल.