गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (20:46 IST)

नाशिक: सुनीता धनगर यांच्या 5 बँक खात्यात मिळून आली “एवढी” रक्कम

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्यासह लिपिक नितीन जोशी यालाही पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
 
दोघांना न्यायालयाने 5 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते, आज त्याची मुदत संपल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाने पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान धनगर यांच्या 5 बँक खात्यांची माहिती एसीबीने घेतली असून त्यातून तीस लाखापेक्षा जास्त रक्कम मिळून आली आहे.
 
शनिवारी एसबीआय बँकेच्या एका खात्यात 12 लाख 71 हजार रुपये जमा असल्याची बाब समोर आली होती. तर पहिल्याच दिवशी धनगर यांच्या घरातून 85 लाख रुपये रोख व 32 तोळे सोने असे कोट्यवधींचे घबाड सापडले होते. धनगर यांना निवृत्तीसाठी अवघा एक वर्षांचा कालावधी बाकी असताना हा प्रकार घडला.
 
धनगर यांच्या स्टेट बँकेच्या 4 खात्यात अनुक्रमे 15 लाख 96 हजार 201, 81 हजार 435, 12 लाख 71 हजार 028 व चौथ्या खात्यात 36 हजार 227 रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात 31 हजार 729 अशी एकूण 30 लाख 16 हजार 620 रुपये एवढी रक्कम मिळून आली.

Edited By- Ratnadeep Ranshoor