गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (10:17 IST)

Nashik : वीज पडून बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

lighting strike
राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात देवळाणे येथे अंगावर वीज पडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कांदे आणण्यासाठी गेला असता या मुलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.  

सध्या सर्वत्र उकाडा जाणवत आहे. राज्यात अनेक भागात तापमानात घसरण झाली असून नाशिकात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रविवारी अचानक पाऊस आल्यामुळे गोंधळ उडाला.अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडांची पडझड झाली तर काही वादळी पावसात वीज कोसळून पवन रामदास सोनवणे याचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पवन कांदे झाकण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.  
 

Edited by - Priya Dixit