सुपारी पत्रकारांची कमतरता नाही, नितीन गडकरीं यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की,सुपारी पत्रकारांची अद्याप कमी नाही. काही पत्रकारांनी तर मर्सडिज कार देखील खरेदी केली आहे.
शनिवारी नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित दिवंगत अनिल कुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.खरं तर पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ मानतात. पत्रकारांसह सुपारी पत्रकारांची कमतरता नाही. आजकाल राईट टू इन्फॉर्मेशन मिळाले आहे त्यामुळे काही पत्रकारांनी मर्सडिज गाडी खरेदी केली आहे.
त्यांनी या वेळी एक घटना सांगितली. ते म्हणाले, मी मंत्रिपदावर असताना एक वर्तमान पत्र निघायचे त्या वर्तमानपत्राचा पत्रकार पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचा. अधिकाऱ्यांनी माझ्याकडे त्याची तक्रार केली आणि म्हणाले, त्याच्याकडे बघा. तो आम्हाला ब्लॅकमेल करतो.
मी त्यांना सांगितले की मी या प्रकरणात काही लक्ष देणार नाही. तुम्हीच त्याच्याकडे बघा. तो तुमच्या ऑफिस मध्ये आल्यावर त्याला खोलीत बंद करा आणि चांगला चोप द्या. रक्तपात करू नका. अधिकाऱ्यांनी असेच केले आणि दुसऱ्या दिवसांपासून त्या पत्रकाराने ते वर्तमान पत्रच कायमचे बंद केले.
पत्रकार संघटनाने ऍथॉरिटी कार्ड कोणाला द्यायचे कोणाला नाही. हे समजून घ्यावे काही असे पत्रकार देखील आहे ज्यांनी आपल्या आदर्शांना सोडून दिले नाही आणि आणीबाणीच्या काळात तुरुंगात देखील गेले.
Edited by - Priya Dixit