शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (16:14 IST)

नितीन गडकरींच्या वक्तव्यावर शरद पवारांनी केले कौतुक

sharad panwar
एका सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आपले वक्तव्य दिले होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात स्टेनलेस स्टीलचे वापर केले असते तर पुतळा पडला नसता.त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी कौतुक केले आहे. 

ते म्हणाले, नितीन गडकरी आपले कोणतेही काम पुर्ननिष्ठेने करतात तसेच त्यांचा कामाचा दर्जा देखील उत्कृष्ट असतो. देशातील चांगले रस्ते बांधण्यासाठी नितीन गडकरी यांचा योगदान आहे.नितीन गडकरी यांनी पुतळा कोसळल्याबाबत चे विधान दिले.ते म्हणाले,जर का पुतळ्यात स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता.त्यांच्या या विधानाला शरदपवारांनी पाठिंबा दिला आहे. 

नितीन गडकरी काही बोलत असतील तर ते तज्ज्ञांचे मत घेऊनच करत असावेत, असे शरद पवार म्हणाले. नितीन गडकरी यांनी कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण झोकून देऊन ते अधिक चांगल्या पद्धतीने  काम करतात. 
Edited by - Priya Dixit