शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (12:54 IST)

पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पवन खेडा आणि नाना पाटोळेंचा भाजपला टोला

nana patole
सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी महाविकास आघाडीने राज्य सरकारला जबाबदार ठरवले असून महाविकास आघाडीने रविवारी सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. महाविकास आघाडीने मुंबईतील हुतात्माचौकातून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढला. 

त्यांनतर काँग्रेसचे नेते नाना पाटोळे आणि पवन खेडा यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खेडा म्हणाले, पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात दुःख आहे. वेदना आहे. राग आहे. हा राग संपूर्ण देशात आहे. 
पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पण त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि अहंकार दिसत होता.

सरकारला पुतळा बनवण्याची घाई होती. कारण निवडणूका जवळच होत्या. राम मंदिराची गळती, संसद भवनातील गळती, पूल उद्घटनापूर्वी कोसळते हे आमच्या कडून गेल्या 70 वर्षांचा हिशोब मागतात तर ह्यांनी केलेल्या गोष्टी 70 दिवस काय 70 आठवडे देखील चालत नाही. 
भाजपचे लोक शिवद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांना तोडले आहे. पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे खेडा म्हणाले. 

तर या वर प्रतिक्रिया देत नाना पाटोळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असा केला जाईल महाराष्ट्राच्या जनतेने हा विचारही केला नाही. आंदोलनासाठी  परवानगीच्या विषयावर ते म्हणाले, आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहित नाही. ते तानशाही करत आहे. त्यांना वाटते की आमचा विरोध कोणीही करू नये. राज्य कर्जबाजारी झाले आहे. महाराष्ट्रात लूट सुरु आहे त्याला आपल्याला रोखायचे आहे.असे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit