ganesh chaturthi
✕

कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही : अनिल परब

Updated: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:04 IST)
 
बरेचसे कामगार कामावर रुजू झाले आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियची कृती समितीशी चर्चा करुन याबाबतीत कामगारांचं म्हणणं, किंवा कामगारांची मानसिकता जी गेल्या काही दिवसात बघितली होती, त्यावर आणि एसटीची सेवा सुरुळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, याबाबत चर्चा करण्यासाठी  बैठक झाली.
 
एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याने त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना सांगितलं संप जेव्हा संपेल तेव्हा यावर चर्चा करु, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. एवढी वाढ दिल्यानंतरही संपाच्या बाबतीत जो काही संभ्रम आहे. त्याबद्दलही चर्चा झाली. 
 
काही जाचक अटी असेल त्यावर विचार केला जाईल, पण त्याचबरोबर कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, याची देखेली जाणीव आम्ही त्यांना करुन दिली असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 
 
पगारवाढ देताना राज्य सरकारने जी हमी घेतली आहे, सर्वांच्या मदतीने एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागणी आल्या आहेत की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आणि आमचा करार दहा वर्षांचा करा, आम्ही त्यावरही विचार करु शकतो, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

यवतमाळ पोलिसांनी कापूस आणि तूर पिकांमध्ये गांजाची लागवड जप्त केली

LIVE: पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला; सीजेपीच्या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द

एमपीएससी विद्यार्थ्यांना आंदोलनसाठी पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

४८,००० कोटींच्या पर्ल्स ग्रुप घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई; मालमत्ता केली जप्त

'गरबा पार्टनर ऑन रेंट' संकल्पनेवर वाद; भोपाळमध्ये हिंदू संघटना आक्रमक, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

पुढील लेख
Show comments