शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (09:27 IST)

न्यायालयाच्या संपूर्ण निकालाला समजून घ्यायचे नाही केवळ एकच ओळ पकडून बोलायचे

Rahul Narvekar
विधानसभाध्यक्षांनी दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यावरून आता आरोप -प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव  ठाकरे यांनी तर नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करताना म्हटले आहे, तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवत माझ्या शिवसेनेच्या विरोधात निकाल द्यायला लावला. त्यावर नार्वेकर यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे.
 
राहुल नार्वेकर म्हणाले की, जर सर्वोच्च न्यायालयाला हे पटवून देण्यात आले असते की माझा निकाल त्यांच्या निर्देशांविरोधात देण्यात आला तर न्यायालयाने माझ्या निकालाविरोधात लगेचच आदेश दिला असता. पण न्यायालयाच्या संपूर्ण निकालाला समजून घ्यायचे नाही केवळ एकच ओळ पकडून बोलायचे हे योग्य नाही. मी दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच आहे. संविधान, पक्षातील संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील बहुमत बघायला सांगितले गेले होते. पक्षाच्या  घटनेत स्पष्टता नव्हती. अध्यक्ष म्हणून मी दिलेला निर्णय चुकीचा आहे असे कोणी म्हणाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited by -Ratnadeep Ranshoor