Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवीण परदेशी यांनी काही तासांतच दिला नव्या पदाचा राजीनामा

Updated: शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:50 IST)
 
कोरोना काळात ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवले होते. त्यानंतर त्यांची अन्य विभागात बदली झाली. मग परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते. पण इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर ठाकरे सरकारने कालच ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी प्रवीण परदेशी यांना मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र परदेशींनी अवघ्या काही तासातच राजीनामा देऊन, केंद्रात जाणे पसंत केले.
 
ठाकरे सरकारने मे २०२० मध्ये तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली होती. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आले होते. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती.
 
प्रविण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते . परदेशी यांनी आपल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

महाराष्ट्रातील १.२५ लाख ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकली, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

पुढील लेख
Show comments