Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्‍या ११ ऑक्‍टोबरला राज्‍यसेवा पूर्व परीक्षा

Updated: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:05 IST)
 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यापूर्वी दोन वेळा राज्‍यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली होती. सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात जारी सूचनेनुसार ही परीक्षा येत्‍या ११ ऑक्‍टोबरला होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जारी केलेल्‍या सूचनांनुसार उमेदवारांनी ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्‍वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, व स्‍मार्टकार्ड प्रमाणे ड्रायव्‍हिंग लायसन्‍स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणायचे आहे. सोबत उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्‍पष्टपणे दिसेल अशी मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य असेल. मूळ ओळखपत्राच्‍या पुराव्‍याऐवजी केवळ त्‍याच्‍या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्‍सशिवाय कोणताही अन्‍य पुरावा ग्राह धरला जाणार नाही. ई-आधार वैध धरले जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.
 
परीक्षेच्‍या दिवशी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्‍या, अतिवृष्टी आदी बाबी लक्षात घेत परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहाणे आवश्‍यक असेल. परीक्षा सुरू होण्याच्‍या एक तास आधी बैठक क्रमांकावर उपस्‍थित राहाणे अनिवार्य असेल. प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत, मास्‍क, फेस शिल्‍ड, हातमोजे, सॅनिटायझरची पारदर्शक बाटली, पाण्याची पारदर्शक बाटली आदी साहित्‍य परीक्षा केंद्रात नेण्यास परवानगी आहे.  

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"ED-CBI च्या धाकानेच शिवसेना फोडली!" कपिल सिब्बल यांचा न्यायालयात खळबळजनक दावा

LIVE: ED आणि CBI ची धाक दाखवून शिवसेनेत फूट पाडण्यात आली; कपिल सिब्बल यांचा मोठा आरोप

'३३,००० रुपयांच्या बुटांवरून गदारोळ': CJP प्रमुख अभिजीत दिपके यांच्याबाबत सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह

राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता 'सातबारा'शिवाय मिळणार 'शेतकरी ओळखपत्र'; सरकारी योजनांचा लाभ मिळणार

रोहिणी खडसे यांनी १० फूट लांब साप हातांनी पकडला; व्हिडिओद्वारे दिला संदेश; नेटकऱ्यांकडून कौतुक

पुढील लेख
Show comments