सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (11:31 IST)

यंदा 10वी,12वी च्या विद्यार्थ्यांसाठी maa.ac.in वर Question Banks जारी

महाराष्ट्र स्टेट बॉर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅन्ड हायर सेकंडरी एज्युकेशन कडून यंदा शिक्षण मंडळ 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांसाठी मंडळाने विशिष्ट गाईडलाईन्स देखील जारी केल्या आहेत. आता बोर्डाने Question Banks जारी केली आहे. SCERT कडून जारी करण्यात आलेली ही Question Banks दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट maa.ac.in वर उपलब्ध होणार आहे.
 
दरम्यान दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Question Banks ची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.
 
Maharashtra 10th, 12th Board Exams 2022 ची Question Banks या प्रकारे पाहता येईल-
State Council of Educational Research and Training ची वेबसाईट maa.ac.in ला भेट द्या.
होमपेजवर तुम्हांला 'Question Banks for 10th, 12 Board Exams.' चा पर्याय दिसेल.
तुम्ही 10वी, 12वी जी इयत्ता निवडली असेल त्यानुसार एक नवं पेज ओपन होईल.
तुम्हांला ज्या विषयाची 'Question Bank' बघायची असेल तो विषय निवडा.
आता तुमच्या समोर असलेली Question Bank तुम्ही पाहून डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता.
दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेचं स्वरूप समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी ही Question Bank मदत करेल असा विश्वास आहे.
 
काही दिवसांपूर्वी राज्यात 10वी,12वी च्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात यासाठी आंदोलन झालं होतं. पण शिक्षणमंडळाने विद्यार्थीसंख्या पहता तितकी तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत. आता बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 तर दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स होणार आहेत.