Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 'जिल्ह्यात' भाड्याच्या घरात थेट बनावट नोटांचा कारखाना थाटला

Updated: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (09:05 IST)
 
हिंगोली - ग्रामीण हद्दीत बनावट नोटा तयार करून बाजारात चलनात आणली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
 
यावेळी योगेशकुमार म्हणाले, शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आनंदनगर भागात बनावट नोटा छापण्याची गुप्त माहिती मिळाल्याने अरूण हनवते यांच्या घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम व त्याचे सोबत एक महिला व इतर साथीदार मिळुन ते बनावट नोटा छापुन प्रिंट करून स्वतः च्या फायदयासाठी त्या नोटा बाजारामध्ये चलनात आणत होता.
 
याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलीस अधीकारी श्री. रामेश्वर वैजने यांना मिळाली त्यानुसार सपोनि ओमकांत चिंचोळकर व पोलीस कर्मचारी रूपेश धाबे, महेश बडे, अर्जुन पड्यन, वसंत चव्हाण, आशा केंद्रे, विजय घुगे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला आणि आनंदनगर भागातील अरूण हनवते यांचे घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम नामे संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) याचे घरी छापा मारला असता १००, २००, ५००, २००० रुपये किमतीच्या नकली नोटा प्रिंट, स्कॅनिंग व झेरॉक्स अशा तिन्ही एकत्रीत सुविधा असणारी कॅनॉन कंपनीची मशिन, नकली नोटा तयार करण्यासाठीचे लागणारे सहित्य जप्त केले. 
 
तसेच महालक्ष्मी देवी यांच्या मुर्ती हया पुरातन कालीन असुन त्या सोन्याच्या असल्याचे सांगून धन सापडले असल्याचे ग्राहकांना सांगत होते. ग्राहकांना अमिष दाखवून फसवुन करण्याकरीता पिवळसर धातुच्या रंगाच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती व बनावट नोटा, १७,४७,३५० व खऱ्या नोटा २०,००० रुपये आणि मशीन व इतर नोटा बनविण्याचे इतर साहित्य १७, ९७५ रुपये प्रिंटर व एक चार चाकी कार किमत ६,४५,००० रुपये चा मुद्देमाल असा एकुण २४,३०,३२५ चा मुद्येमाल जप्त करून आरोपी संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) यास अटक करून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरुद्ध व छायाबाई गुलाबराव भुक्तार यांचे विरूध्द भादवी कलम ४८ ९ (अ), ४८ ९ (ब) , ४८ ९ (क), ४८ ९ (ड), ४८ ९ (ई), ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments