Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Updated: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (13:04 IST)
 
जसे की माहित आहे ठाण्यातील 5 टोल नाक्यांवरील दरवाढी विरोधात मनसेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते आणि उपोषण मागे घेताना राज यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार असे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज ही भेट होणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील टोलनाक्यावरील मनसेचे आंदोलन चर्चेत आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी मुलुंड-ठाणे टोलचे दरवाढी विरोधात आमरण उपोषण सुरु केले होते मात्र 4 दिवसांनी राज ठाकरे यांनी अविनाश जाधवांची भेट घेत उपोषण आपलं काम नसून या प्रश्नी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असे आश्वासन दिले होते.
 
सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी चार वाजता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टोलबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीकडे राज्याचे लक्ष आहे.
 
आजच्या बैठकीत होणार्‍या चर्चेची माहिती स्वत: राज ठाकरे माध्यमांना देणार असून जर सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही तर मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहून वाहने सोडतील तर जिथे वाहने सोडली जाणार नाही तिथे टोलनाके जाळू अशा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले

झिम्बाब्वेमध्ये बोट अपघातातील मृतांचा आकडा वाढला, आणखी २६ मृतदेह सापडले, मृतांचा एकूण आकडा ७२ वर

Israel-Hezbollah War: शस्त्रसंधी सुरू असताना दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली संरक्षण दलाचा हल्ला, सात जण ठार

महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजना समाविष्ट केल्या

ऋषभ पंत ॲडम गिलक्रिस्टला मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील नंबर १ यष्टीरक्षक-फलंदाज बनले

पुढील लेख
Show comments