Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी दिली ही जबरदस्त प्रतिक्रीया

Updated: गुरूवार, 30 जून 2022 (14:59 IST)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव यांचे चुलत बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. राज ठाकरे यांनी आज एक ट्विट केले आहे. राज यांनी एक हिंदी म्हण प्रसारीत केली आहे. त्यात म्हटले आहे की, "जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना कर्तृत्व मानने लगता आहे, उस दिन से पतन का प्रवास शुरू होता है."
 
शिवसेनेचे नेतृत्व करणे ही केवळ पुण्याई आणि नशिब म्हणून उद्धव यांना मिळाले. ते त्यांचे कर्तृत्व नसल्याचे राज यांना म्हणायचे आहे. त्यामुळेच राज यांनी एकप्रकारे उद्धव यांना कडक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. अर्थात राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उद्धव यांचे कुठेही नाव घेतलेले नाही.
 
राज यांच्याकडून अतिशय आक्रमकपणे प्रतिक्रीया येणे अपेक्षितच होते. उद्धव यांच्याशी पटत नसल्यानेच राज हे शिवसेनेतून बाहेर पडले होते. राज यांना उद्धव यांचे नेतृत्व मान्य नव्हते. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज यांंनी उद्धव यांच्यासह सरकारला चांगलेच लक्ष्य केले. भोंग्यांचा विषयही त्यांनीच उचलला होता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Electric Scooter : बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, 3KWh बॅटरी आणि USB पोर्टसह आली

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सोलापूरात जिल्हा परिषद शाळेत स्लॅब कोसळून १३ विद्यार्थी जखमी

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

राज ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर अनपेक्षित भेट, राजकीय वातावरण तापले

पुढील लेख
Show comments