सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (08:33 IST)

राज ठाकरे यांची माहीममधील बांधकामाचा आधीचा आणि कारवाईनंतरचा फोटो ट्वीट करत प्रतिक्रिया

raj thackeray
राज ठाकरे यांनी माहीममधील बांधकामाचा आधीचा आणि कारवाईनंतरचा फोटो ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. “धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची आणि सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात दाखवली होती. त्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. तत्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी दक्ष राहाण्याचे आवाहन केले. “आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमण राज्यभर सुरु आहेत. हे फक्त अतिक्रमण नव्हे, तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमण आहे. त्यावर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited By - Ratnadeep ranshoor