शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:23 IST)

राज सांगतात..... ''साहेब तेवढे फक्त ते दोन टायर बदला''

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील एसटी कर्मचा-यांच्या संपावर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. यातून राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. चित्रामध्ये  एसटी कर्मचारी मुख्यमंत्र्यांना सांगत आहे की, ''साहेब तेवढे फक्त ते दोन टायर बदला. मग आमच्या मागण्या तुम्हाला फुगलेल्या वाटणार नाहीत''. या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे व्यंगचित्रात एसटीच्या मागील दोन टायर फुगलेले दाखवण्यात आले असून त्यावर मंत्री व अधिका-यांचा भ्रष्टाचार,असे लिहित राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.