शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (14:54 IST)

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

rape
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ आणि वडिलांना जीवे मारेन अशी धमकी देत हा बलात्कार १ ऑक्टोबर २०२१ ते ३० जून २०२२ दरम्यान संशयिताने केला. युवतीस डांबून ठेवल्याने हा प्रकार पोलिस स्थानकात पोहचलाय कुणाल जगताप (रा.मोरे हॅास्पिटल समोर पवननगर) असे संशयिताचे नाव आहे. परिसरात राहणा-या पीडितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयिताने पीडितेशी ओळख वाढवून तरुणीस आपल्या घरी नेले. यावेळी त्याने वडिल आणि भावास जीवे मारेन अशी धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. गुरुवारी युवतीवर बलात्कार करून संशयिताने आपल्या घरात डांबून ठेवल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला असून अधिक तपास पीएसआय पावरा करीत आहेत.