सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified सोमवार, 13 जून 2022 (11:55 IST)

बस चालकाचा महिलेवर बलात्कार!

पुण्यातून 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे की पुण्यातील कात्रजमध्ये खासगी बस चालकाने तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. ही संतापजनक घटना शुक्रवारी (10 जून) रात्रीच्या सुमारास घडली.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असून ती गुरूवारी एका खासगी बसने आपल्या पतीसोबत पुण्यात आली होती. रात्री पुण्यात आल्यानंतर दोघेही राहण्यासाठी खोली शोधत होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे खासगी बस चालकाने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती लघुशंकेसाठी गेले.

दरम्यान, महिलेचे पती लघुशंकेसाठी गेल्याचे बघताच, महिलेवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपी नवनाथ याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.  याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी बसचालकाच्या मुसक्या आवळल्या आहे. नवनाथ शिवाजी भोंग (38) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.