suvichar
✕

मुंबईत एयर होस्टेससोबत सामूहिक दुष्कर्म, एअरलाईन सुरक्षा अधिकार्‍याला अटक

Updated: गुरूवार, 6 जून 2019 (13:13 IST)
 
23 वर्षीय आरोपीचं नाव स्वप्नील बदोनिया असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो एअरलाईन्स सुरक्षा विभागात कार्यरत आहे. इतर दोन व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
 
पोलिसांप्रमाणे घटना सोमवारी घडली जेव्हा पीडिता हैदराबादहून मुंबई पोहचली. ती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी सात वाजता पोहचली. नंतर तिला आरोपी भेटला. दोघे एकाच कारने विमानतळाहून बाहेर पडले आणि तिने त्याला मलाड येथील एका मॉलजवळ सोडून पुढे निघाली. तिने घरी जाऊन आपलं सामान ठेवलं आणि पुन्हा मॉलपाशी आली जिथे आरोपी तिची वाट बघत होता. नंतर दोघे बारमध्ये गेले. दोघांनी बार बंद होईपर्यंत दारूचे सेवन केले.
 
स्वप्नील बदोनियाप्रमाणे पीडितेने एवढी दारू प्यायली की तिला घरा पाठवण्याऐवजी हॉटेलमध्ये चेक-इन करणे असे ठरवले पण तिची अवस्था बघून चेक-इन करण्याची परवानगी मिळाली नाही. नंतर आरोपीने तिला फ्लॅटवर थांबण्याचा सल्ला दिला जिथे तो इतर दोन रुममेट्ससोबत राहतो.
 
पीडितेने सांगितले की 'तो मला आपल्या अंधेरी (पूर्व) स्थित फ्लॅटवर घेऊन गेला जिथे त्याचे दोन रुममेट आणि एक महिला उपस्थित होती. माझ्या अवस्थेचा फायदा घेत त्यांनी माझ्यासोबत दुष्कर्म केलं आणि मारहाण देखील केली.' सूत्रांप्रमाणे सकाळी दहा वाजत उठल्यावर तिच्या डोळ्या आणि खांद्यावर जखमा दिसल्या.
 
जेव्हा पीडितेने स्वपनिलला विचारले तर त्याने नशेत असल्यामुळे काहीच आठवत नाही असे म्हटले. दुसर्‍या महिलेला विचारल्यास तिने उत्तर देण्यास नकार दिला. अधिकार्‍यांप्रमाणे रात्रभर तिचे वडील तिला फोन करत होते पण तिने फोन रिसीव्ह केला नाही. मात्र एका मित्राने तिला जोगेश्वरीजवळ मॅकडोनाल्ड्समध्ये स्वप्नील बदोनियासोबत बघितले होते.'
 
पीडितेचा मित्र तिला घरी घेऊन गेला आणि जेव्हा वडिलांनी जखम झाल्याचे कारण विचारले तर आरोपीने तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचे सांगितले. वडील तिला हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा पोलिसात सूचना करण्यात आली.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments