बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, फक्त १० टक्केच पाणी उरले

मुंबईत मान्सून १३ जूननंतर दाखल होणार आहे. तोपर्यत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातील जलसाठा आणखी खालवणार आहे. आताच  दहा टक्केच पाणीसाठा तलाव क्षेत्रात शिल्लक राहिला आहे.
 
मान्सून आणखी लांबल्यास किंवा पुरेसा पाऊस अपेक्षित दिवसांत झाला नाही, तर मात्र महापालिकेला राखीव साठा वापरावा लागणार आहे. मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात जलटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे, शिवाय मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे.
 
मुंबई शहर आणि उपनगरास दिवसाला ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या जलसाठ्याचा विचार करता, मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दहा टक्के पाणीकपात करण्यात आल्याने रोजचा पुरवठा ३ हजार ५०० दशलक्ष लीटरवर आला आहे.