शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (18:38 IST)

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत पूर्णपणे  बंद ठेवण्यात येणार आहे़. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ ८५/१०० या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे़.  हलकी चारचाकी व इतर वाहने किवळे पुलावरुन जुना मुंबई -पुणे महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. 
 
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किमी ५५/६०० आणि ८८ वर (मुंबई वाहिनी) वर हे काम करण्यात येणार आहे़. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीची  सध्यस्थिती समजावी यासाठी हे फलक लावण्यात येत आहेत़. वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, अशी आवाहन पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे  यांनी केले आहे.