मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 8 मे 2019 (12:54 IST)

मुंबई विमानतळावर अपघात टळला, हवाई दलाचं विमान रनवेहून पुढे निघाला

IAF Aircraft
मुंबई: हवाई दलाचं एएन-32 विमान मुंबई विमानतळावर उड्डाण घेत असताना रनवेहून पुढे निघून गेला. विमान बंगळुरुला जाण्यासाठी उड्डाण करत होतं. त्यावेळी धावपट्टीवरुन ठराविक अंतर कापल्यानंतरही विमानानं उड्डाण केलं नाही. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. एअरफोर्स अधिकारी याचे कारण तपासत आहे.
 
माहितीनुसार मंगळवारी रात्री 11 वाजून 39 मिनिटावर हवाई दलाचं एएन-32 विमान धावपट्टी क्रमांक-27 वर ओव्हररन झाला. 
 
विमानतळावरील 27 व्या क्रमांकाची धावपट्टीवरुन नागरी विमानांची उड्डाणं होत नाहीत. त्यावेळी त्या भागात कोणीही नव्हतं. यामुळे अपघात टळला. मात्र यामुळे इतर विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. काही विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या. तर काहींची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.