सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (18:30 IST)

भाजपाच्या नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

lok sabha election 2019
मतदान झाल्यावर मनसे पक्षावरील आलेल्या रागातून भाजपच्या नगरसेवकाने मनसैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला असून, जवळपास  आठ ते दहा गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली आहे.

या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील विजय चिपळेकर हे  नगरसेवक आहेत. त्यांनी दि. 29 एप्रिलला रोजी रात्री   विजय चिपळेकर यांनी जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते. हा केला आणि चिपळेकर व त्याचे गुंड साथीदार फरार झाले  आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत असा आरोप जाधव यांच्या भावाने केला आहे.