सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नवर्‍याने बेडरुममध्ये डॉक्टर पत्नीचे नग्न फोटो काढले

एका महिला डॉक्टरने खळबळजनक आरोप करत सांगितले की माझ्या पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी माझे नग्न फोटो काढले आणि त्याआधारे माझा लैंगिक छळ केला जात आहे.
 
मुंबईत वरळी येथे सासरी राहत असलेली ही डॉक्टर महिला आता कर्नाटकला आपल्या माहेरी निघून गेली आहे. 2013 मध्ये या महिलेचे विवाह डॉक्टर रित्विक हेगडे यासह झाला होता. पीडित महिलेप्रमाणे विवाह झाल्यावर सासरच्यांनी छळायला सुरु केले. शिव्या देणे, टोमणे मारणे इतपत नव्हे तर माझ्या पतीने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी माझे बेडरुममधील नग्न फोटो काढले आणि त्याआधारे माझा छळ करत आहेत, असे डॉक्टर महिलेने आरोप केला आहे.
 
पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती रित्विक, सासू सुतारिता आणि नणंद तनूश्री यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.