शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:23 IST)

राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ

sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या त्यांच्या जामीन अर्जावरही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) संजय राऊत यांना अटक केली. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत.
 
राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली. त्यांना प्रथम ईडी कोठडी सुनावण्यात आली. तर, 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून खासदार संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. या घोटाळ्याप्रकरणी राऊतांच्या संपत्तीवरही ईडीने छापेमारी केली आहे.
 
ईडीने संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात, पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊतांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे, असा दावा करण्यात आला आहे. तसेच हा 1039 कोटी रुपयांचा गैरव्यवहार असून त्यात राऊतांचा थेट सहभाग असल्याचेही ईडीने म्हटले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor