मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (12:22 IST)

MH BOARD SSC RESULT: इयत्ता दहावीचा निकाल घोषित

SSC result 2022
MH BOARD SSC RESULT:महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल घोषित करण्यात आला आहे. विद्यार्थी राज्यशिक्षण मंडळाच्या वेबसाईट वर हा निकाल पाहू शकतात. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 17 जुन रोजी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्यातील कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.27% लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 96.96 टक्के, नागपूर विभाग - 97.00 टक्के ,औरंगाबाद विभाग -96.33 टक्के  मुंबई विभाग 96.94 टक्के कोल्हापूर विभाग - 98.50 टक्के अमरावती विभाग - 96.81टक्के नाशिक विभाग - 95.90 टक्के आणि लातूर विभाग - 97.27 टक्के लागला आहे. 
 
दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान ऑनलाईन जाहीर होणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार असून विद्यार्थी त्यांचा रोलनंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन निकाल बघू शकतात. 
 
online result -