गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2019 (09:26 IST)

सोडून गेलेल्यांमुळे फरक पडत नाही, उलट नवीन चेहऱ्यांना संधी मिळते – महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. पक्षाने दाखवलेला विश्वास हा हा सामान्य कार्यकर्त्याचा बहुमान आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच न्याय मिळतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली ११ वर्षे संघटनेचे काम केल्यामुळे कामाचा चांगला अनुभव आहे, त्याचा फायदा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दोन दिवसात राज्यव्यापी दौरा सुरू करणार असून अनेक आव्हाने येतील पण त्याला सामोरे जाण्यासाठी सदैव तप्तर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्यांमुळे फरक पडत नाही, उलट नवीन चेहऱ्यांना संधी मिळते आणि पक्ष वाढीस मदत होते, असा टोला त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांना लावला आहे.