शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:42 IST)

साईबाबांना ६ दिवसात २ कोटीचे नव्या नोटाचे दान

नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीतील साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचे दान अर्पण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन हजारच्या नवीन नोटांचाही समावेश आहे. गेल्या सहा दिवसात साईबाबांच्या दानपेटीत दोन कोटी 32 लाखांचे दान जमा झाले आहे. यात  जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटांसोबतच नव्या चलनाचाही समावेश आहे. जुन्या पाचशेच्या 9 हजार 218 तर एक हजारच्या 3 हजार 250 नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. दोन हजाराच्या 999 तर पाचशेच्या 51 नव्या नोटा दानपेटीत आल्या आहेत.